सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

भारतीय प्राचीन युध्द कलेस आधुनिक स्तरावर खेळाचे स्वरूप देणाऱ्या आर्चरी खेळाचे 'हे' आहेत प्रमुख्य वैशिष्ट्ये

पुजा    22-04-2024 15:06:05

पुणे : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मर्दानी खेळ या युद्ध कलेने व महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक कै. कॅप्टन शिवरामपंत दामले यांच्या विचाराने प्रेरीत होऊन तसेच या खेळाच्या निर्मितीकरीता मला नेहमीच प्रेरणा व प्रोत्साहन देणारे प्राध्यापक डॉ. शरद आहेर सर व प्राचार्य डॉ. सोपान कांगणे सर तसेच मला तांत्रिक मार्गदर्शन करणारे माझे गुरू मुख्याध्यापक पैलवान निवृत्ती काळभोर सर व वरीष्ट पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र निकाळजे सर यांना या खेळाचे श्रेय देऊन कायम त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करेल.

कै. कॅप्टन शिवरामपंत दामले (शिवा काका) यांनी सन १९२४ मध्ये शारीरिक शिक्षणाचे महाविद्यालय असावे ही संकल्पनेचे बीज रोवले. त्याला २०२४ मध्ये १०० वर्षे म्हणजेच शतकोत्सव झाला. याच पावन पुण्य भूमीवर महा७राष्ट्रीय मंडळाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे रोवण्यात आले. याच भूमीवर भारतातील दिग्गज व्यक्ती घडल्या आहेत. त्यामध्ये उच्चस्तरीय शासकीय अधिकारी, पोलीस, क्रिडा पुरस्कर्ते, शिक्षक, क्रीडा शिक्षक, प्राध्यापक, नामवंत मल्ल, शरीर सौष्ठव, योग विद्या, क्रिकेटर, अभिनेते अशा नामवंत व्यक्ती याच भूमीत तयार झाले आहेत.

जॅव्हपीन आर्चरी या खेळाची निर्मितीदेखील याच पवित्र भूमीवर झाली असल्याचा मला अभिमान असून महाराष्ट्रीय मंडळाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवण्यात खारीचा वाटा मिळाल्याचा आनंद आहे. मी उमेश रमेश लोंढे, शारीरिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी शिक्षक असून या खेळाचा सादरकर्ता आहे.

जॅव्हलीन+आर्चरी या दोन मुख्य खेळांच्या कौशल्यांचा समावेश असलेला एकत्रित होय. या खेळाला भरपूर क्रीडा मार्गदर्शक, क्रीडातज्ज्ञ यांनी विविध नावे देण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने जॉ आर्च, थ्रो आर्च, डार्ट-आर्च असेही नावाने ओळखले जाते तर युरोपियन राष्ट्रांमध्ये स्पियर थ्रो या नावाने प्रचलित आहे. परंतु याला कोणत्याही प्रकारचे क्रीडा प्रकारामध्ये खेळले जात नसून एक मनोरंजनात्मक कला म्हणून पाहिले जाते. जॅव्हलीन आर्चरी हा खेळ अचूकता व भेदकता या दोन मुख्य कौशल्यांवर आधारीत असून एकाग्रता व ताकद ही तेवढीच महत्त्वाची आहे. प्राचीन काळापासून ही कला मुख्यतः मार्शल आर्टचा उपप्रकार असून प्रथम जंगली हिंस्त्र प्राण्यांपासून व नंतर प्राण्यांच्या शिकारी करीता तसेच कालांतराने ही कला पुढे युद्धामध्ये प्रतिस्पर्ध्याला दुरूनच मारण्याकरीता बापरली जाऊ लागली.

आजही लहान मुले गावाखेड्यांमध्ये या कलेचा खेळ खेळतात. प्राचीन कलेलाच खेळाचे शास्त्रीय व विस्तारीत, नियमबद्ध स्वरूप देण्याचे कार्य होत आहे. तसेच खेळाडूच्या सूप्त क्रिडागुणांना वाव देण्याकरीता या पुनरुज्जीवित करण्यात येत आहेत. या खेळाच्या निर्मिती करीता विविध संस्था व शाळांतील विविध वयोगटातील विद्यार्थ्यावर प्रायोगिक विचार करून व कृती क्षमतेच्या आधारे नियमावली, साहित्य, मैदानाचे अंतर, वजने, मुलभूत कौशल्ये, कारक कौशल्ये, व्यायाम, उत्तेजक व्यायाम, ईजा-दुखापती यांवरची उपाय योजना, इनडोअर, आऊटडोअर या प्रमाणे याची रचना करण्यात आली असून याची संपूर्ण मार्गदर्शिका उपलब्ध असून संपूर्ण विस्तारीत रूपात यामध्ये माहिती देण्यात आली आहे.

खेळ निर्मिती मागील मुख्य उद्देश म्हणजेच दोन्ही खेळामध्ये या प्रशिक्षणाकरीता येणारा खर्च हा सर्वसामान्य खेळाडूंच्या आवाक्याबाहेरचा असतो. सर्वेक्षणातून तर असे लक्षात आले की आर्चरी हा खेळ अजून विद्यार्थ्यांना माहीतदेखील नाही. त्याची अधिक माहिती व खर्च सांगताना विद्यार्थी खर्च ऐकूणच याकडे वळण्याचे धाडस करत नव्हती. हाच न्यूनगंड संपवण्याकरीता या दोन खेळांचा संमीश्र व प्राचीन भारतीय युद्धकलेला खेळाचे नवे रूप देण्याचा संकल्प करण्यात आला.

या खेळाचे विशेष आकर्षण व वैशिष्ट्य म्हणजे अगदी लहान वयोगटाचे विद्यार्थीदेखील याचा सराव कोणत्याही सहाय्यकाशिवाय, कोणत्याही अतिरिक्त साहीत्याशिवाय व स्वतःची क्रीडा कौशल्यांच्या चुकांची सुधारणा स्वतःच करू शकतो अगदी कमीत कमी जागेत, स्वतःचे गुणांकन स्वतः करू शकतो, ईजा दुखापती होण्याचे प्रमाणदेखील अगदी कमी असल्याने या खेळाकडे अगदी वेगाने नवनवीन खेळाडू या खेळाकडे वळू लागले असून यामध्ये प्रावीण्य मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू झाला आहे.

लवकरच हा खेळ महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये खेळला जातो याचे राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू हे महाराष्ट्राचे जात उंचावण्यात खारीचा वाटा प्रथम उचलतील तसेच शालेय स्तर, स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, एस.जी.एफ.आय., ए.आय.यु गेम्स, खेलो इंडीया सारख्या मोठ्या खेळांच्या यादीत लवकरच सर्वांच्या सहकार्याने लवकरच झळकेल.

जॅव्हलीन आर्चरी वर्ल्ड फेडरेशनच्या जागतिक स्तरावर आज श्रीलंका, पाकिस्तान व कांगो हे देश या खेळास पसंती देत त्या ठिकाणी सराव करीत आहेत. लवकरच संपूर्ण विश्वात पोहचविण्यास प्रयत्नशील राहील. ज्या-ज्या ठिकाणी या खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली व खेळाचे उद्बोधन वर्ग घेण्यात आले त्या ठिकाणचे विद्यार्थी यांनी खेळास खूप पसंती देऊन सराव चालू ठेवण्याचे वचन दिले. तसेच साधी सोपी व कोणतीही चिकट नियमावली, मैदाने व साहित्ये नसल्यामुळे क्रिडाशिक्षकांची देखील याला मान्यता व आवड आहे.

जॅव्हलीन आर्चरी खेळाचे काही प्रमुख्य वैशिष्ट्ये :

* खेळाडू त्याच्या आवडीचा कोणत्याही प्रकारचा भाला वापरू शकतो. अगदी स्वतःने बनवलेला देखील त्यामधे लाकडी, स्टील, कार्बन, लोखंडी, मिक्स. प्रत्येक फेकीकरीता १ मिनिटाचा अवधी मिळतो. तसेच हव्या त्या पद्धतीने तो फेकू शकतो.

* प्रत्येक राऊंडमध्ये ३० गुणांची स्पर्धा असे ३ राऊंड म्हणजेच एकूण ९० गुणांची स्पर्धा असणार. त्यामुळे स्कोर पुढे वाढवण्याकरीता भरपूर संधी उपलब्ध असते.

* सब ज्युनियर, ज्युनियर, सिनीयर व मास्टर्स गटामध्ये खेळण्याची संधी असते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती