सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

महाराष्ट्र राज्य आणि पुणे व जिल्हा क्रीडा परिषदव्दारा बालेवाडीत ६ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा २०२३-२४ क्रीडा स्पर्धांना सुरुवात

डिजिटल पुणे    24-04-2024 10:53:33

पुणे : भारतीय शालेय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व्दारा दि. २३ ते २८ एप्रिल, २०२४ या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा २०२३-२४ क्रीडा स्पर्धांना आज सुरुवात झाली. या स्पर्धेचा उदघाटन समारंभ राज्या क्रीडा सहसंचालक श्री सुधिर मोरे यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी श्री मोरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत असताना सहभागी झालेल्या खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करुन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सातत्यपुर्ण सराव व कठोर मेहनत करण्याचे आवाहन केले.  या प्रसंगी क्रीडा उपसंचालक श्री सुहास पाटील, स्पर्धेचे तांत्रिक पंच प्रमुख विकास चौरसिया, भारतीय शालेय खेळ महासंघाचे निरिक्षक श्री मुकेश कुमार, प्रतिनिधी श्री लईक खान उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांनी तर आभार प्रदर्शन दादासाहेब देवकते यांनी केले. \

आजचे निकालः-

१९ वर्षाखालील मुलेः- (साखळी सामने)

१) राजस्थान वि. वि. विद्याभारती (३६-०) नमन शर्मा १०, राजन रावत ११, अभिषेक राठोड १५, 

२) महाराष्ट्र वि. वि. बिहार (१०-७) सुरज येवले ५, ओंकार मोरे ५ / गोल्डन कुमार ५, राजा कुमार २

३) ओरिसा वि. वि. गुजरात (४०-०) देवाशिष नाईक २५, भरत किसन ५, धर्मेंद्र ओसवाल ५, चिन्मय नाईक १५

४) छत्तीसगढ वि. वि. सी. बी.एस.ई (१७-०), लिलांशु शहा १५, मेहुल शहा २

५) आंध्रप्रदेश वि. वि. आय. पी. एस. सी. (४३-०), माहिपती संतोष २१, सिकोटी कुमार १०, योगिनि प्रसाद १२

६) दिल्ली वि. वि. मध्यप्रदेश (४१-०), शहबाज अन्सारी १६, शुभम पांडे १०, आदित्य कुमा१०, विनित कुमार ५

७) बिहार वि. वि. ओरिसा (२८-०), गोल्डन कुमार १५, राजा कुमार ८, सागर कुमार ५

८) महाराष्ट्र वि. वि. गुजरात (३८-०), सुरज येवले १०, संदिप कुंभार ८, यश जाधव १०, हर्षवर्धन पाटील ५, पृथ्विराज माने ५

९) छत्तीसगढ वि. वि. आंध्रप्रदेश (२२-०), विजय कुमार १५, लिलांशु शहा ५, मेहुल शहा २, 

१९ वर्षाखालील मुली (साखळी सामने)-

१) महाराष्ट्र वि. वि. तेलंगणा (४२-०), नम्रता पाटील ७, तृप्ती पाटील १०, स्वाती हगवणे १५, सुमन रावते १०

२) राजस्थान वि. वि. मध्यप्रदेश (३३-०), प्रियंका रावत २३, तनु राजपुत १०

३) महाराष्ट्र वि. वि. आंध्रप्रदेश (२७-०) तृप्ती पाटील ५, समृध्दी कदम ५, निकिता शिंगारे ५, नम्रता पाटील ७, अपुर्वा बोराटे ५

४) बिहार वि. वि. सि.बी.एस.ई (३२-०) आरती कुमारी १०, गुडीया कुमारी २, अंशु कुमारी ५, शिखा ५, चुनचुन कुमारी ५, करीवा ५

५) मध्यप्रदेश वि. वि. आय. पी. एस. सी. (१५-०) लिशा वेद ५, मनिषा एम. १०

६) ओरिसा वि. वि. सि. बी. एस. ई (१०-०) हिशेतुडु ५, मोनिषा मंजु ५

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती